नागपूर : शहरात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचारांच्या घटना घडत आहे. एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिळवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच ती गर्भवती झाल्याचे समजताच बळजबरीने गर्भपातही करून घेतला.
इतकेच नाही तर त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरोपीच्या जाचाला कंटाळून त्याची तक्रार अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये केली. त्यांनी पोलिसांनी तडकाफडकी आरोपीला अटक केली आहे. विशाल हनुमंत पिल्लेवान (वय २१रा. अंबाझरी) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. विशाल अंबाझरी परिसरात भुट्टा विकतो.
विशालने केलेल्या अत्याचारातून मुलगी गर्भवती झाली. विशालने तिला गोळ्या देऊन गर्भपात करून घेतला. यानंतरही तो मुलीला त्रास देत होता. तसेच तिला मारहाण करून धमकावतही होता.
हे प्रकरण मुलीच्या कुटुंबीयांना माहित झाले. पीडित मुलीने कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून विशालला अटक केली आहे.