Published On : Sun, Oct 15th, 2017

रामटेक नगर परिषदेला पंतप्रधान आवास योजना केंद्र शासनाकडून लागू

रामटेक: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातील सर्व शहरांमध्ये सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील काही शहरांची निवड झाली होती .या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात केंद्र शासनाने रामटेक नगर परिषदेचा समावेश केला असून त्यासाठी लागणारा रामटेक शहराचा सर्वेक्षण करून घरकुलासाठी पात्र असलेला लाभार्थींची निवड करून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे .

या योजनेअंतर्गत चार घटक असून त्या चार घटकांतर्गत समाजातील सर्व स्तरातील बेघरांचा व कुटुंबाचा विचार करण्यात येणार आहे.

(अ) घटक क्रमांक एक* :-जमिनींचा साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्यावरील झोपिपट्टयांचा “आहे तेथेच “पुनर्विकास करणे.

(ब) घटक क्रमांक २* :- कर्ज संलग्न व्याज अनुदानांच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणारया घरांची निर्मिती करणे.

क) घटक क्रमांक 3:-* भागीदारी तत्त्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे.
*घटक क्रमांक ४:-* आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घर बांधण्यासाठी व्यक्तिगत अनुदान देणे .

विविध घटकांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी २.५ लाखांची आर्थिक मदत मिळणार असून लाभार्थी घरकुलाचा स्वविकास किंवा कर्ज स्वरुपात सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतात.या योजनेच्या अधिक माहितीसाठी नगर परिषद रामटेक येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

या सर्व घटकांतर्गत लाभार्थींची निवड करण्यासाठी शहरात लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहान मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी केले आहे .