Published On : Sat, Jun 8th, 2024
By Nagpur Today Nagpur News

रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

Advertisement

हैदराबाद:रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी पहाटे निधन झाले. हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटे ३.४५ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माहितीनूसार,रामोजी राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती.

त्यांना हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. रामोजी राव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ या दिवशी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावातल्या एका शेतकरी कुटुंबात झाला.त्यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मार्गदर्शी चिट फंड, ईनाडू न्यूजपेपर, ईटीव्ही नेटवर्क, रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूड्स, कालांजली, उषाकिरण मूव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान रामोजी राव यांच्या निधनानंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

मी स्वतःला भाग्यवान समजतो की रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या निधनाचं वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, सहवेदना, असे मोदी म्हणाले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.