Published On : Fri, Jun 22nd, 2018

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर राज्यात चित्रनगरी विकसित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची घोषणा

मुंबई : चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करण्यात येईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सहव्यवस्थापकीय संचालक निवृत्ती मराळे, धर्मदाय उपायुक्त भरत व्यास तसेच चित्रपट क्षेत्रातील संबधित व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या चित्रनगरीमुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील होतकरु तरुणांमधून भावी पिढीतील दिग्दर्शक, गायक, गीतकार घडविण्यासाठी महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही श्री. तावडे यावेळी म्हणाले.