Published On : Tue, Aug 9th, 2022

रामेश्वरम ते काशी पदयात्रे करूचे कन्हान विकास मंच द्वारे भव्य स्वागत

Advertisement

कन्हान : – तमिलनाडु येथील रामेश्वरम येथुन ते काशी विश्वनाथ मंदिर पर्यंत निघालेल्या पदयात्रा करूचे कन्हान शहर विकास मंच द्वारे फुलाच्या वर्षाव, मिठाई वाटप करून भव्य जोरदार स्वागत करण्यात आले.

तमिलनाडु येथील रामेश्वरम गावातील भक्तानी काशी (वाराणसी) पदयात्रेचे आयोजन करून ही पद यात्रा (दि.२६) मे ला रामेश्वरम मंदिर येथे पुजा अर्चना करून पदयात्रे ची सुरूवात करून तमिलनाडु, कर्नाट क, आंध्रप्रदेश, तेलंगाना व महाराष्ट्रातील काही भागातु व पायदळ भ्रमण करित (दि.६) ऑगस्ट ला रात्री कन्हान गांधी चौक येथील हनुमान मंदिरात पोहचली. रविवार (दि.७) ऑगस्ट ला कन्हान शहर विकास मंच द्वारे रामेश्वरम ते काशी विश्वनाथ मंदिर पर्यंत निघाले ल्या पदयात्रे करू भक्तांचे स्वागत समारंभ कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित नागपुर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्री मोतीराम रहाटे, मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, ताराचंद निबांळकर सह आदी मान्यवरांच्या हस्ते पदयात्रेत सहभागी भक्तांचे पुष्पहार घालुन, फुलांचा वर्षाव व मिठाई वाटप करून भव्य जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , सचिव सुनिल सरोदे, शहर विकास मंच चे अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे सह मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.