Published On : Thu, Feb 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

रामदासपेठ पूल दुचाकी वाहतुकीसाठी सुरू

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने व मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड यांनी केले निरीक्षण
Advertisement

नागपूर : नागपूर शहरातील रामदासपेठ पूल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी गुरूवारी १ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला. मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने व मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड यांनी गुरूवारी पूलाचे निरीक्षण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. लहाने यांनी पूल दुचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी सुरू करण्याचे निर्देश दिले.

यावेळी कार्यकारी अभियंता श्री. विजय गुरूबक्षाणी व श्री. कमलेश चव्हाण, उप अभियंता श्री प्रमोद मोखाडे व महानगरपालिकेचे अनेक अभियंता उपस्थित होते.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालयाजवळ नाग नदीवर नागपूर महानगरपालिकेद्वारे पुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ८ कोटी रुपये राशी प्रस्तावित आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये कामाला सुरूवात झाली असून पुलाचे एका बाजुचे काम पूर्णत्वास आलेले आहे. पुलाचे ४३ गर्डर कास्टींगचे काम पूर्ण झालेले असून २६ गर्डर ठेवण्यात आले आहेत. उर्वरित गडर टाकण्याचे काम देखील सुरू आहे.

अर्ध्या भागावर स्लॅब टाकण्याचे काम सुध्दा पूर्ण झालेले आहे. या अर्ध्या भागाच्या दोन्ही बाजूने अॅप्रोच रस्त्याच्या कामाकरीता संरक्षण भिंतींचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरीत अर्ध्या भागाचे गर्डर लॉंचींगचे काम सुरू असुन स्लॅब टाकणे, ड्रेन टाकणे, पॅरापीट भिंत व उर्वरीत अॅप्रोच रस्त्याचे डांबरीकरणसह रिटेनिंग वॉलचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Advertisement

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सध्या दुचाकी वाहने आणि पायी चालणा-या व्यक्तींकरीता एका बाजुने पूल सुरू करण्यात आलेला आहे. दोन्ही दिशेने ये-जा करणाऱ्या चार चाकी वाहानामुळे वाहतुक कोंडी होण्याची शक्यता असल्याने सध्या दोन्ही दिशेने केवळ दुचाकी वाहनांसाठी पुल सुरु करण्यात आले आहे.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges