Advertisement
नागपूर : देशभरात आज रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. नागपूर शहरही राममय झाले असून नागपूरच्या ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरात भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी सकाळपासून भक्तांनी मोठी गर्दी केली.
हे मंदिर ऐतिहासिक असून गेल्या 57 वर्षांपासून राम जन्माच्या नंतर इथून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येते. या राम मंदिरात सकाळपासून दर्शनाससाठी गर्दी झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळीही मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. अतिशय आनंदमय आणि भक्तिमय वातावरण सध्या नागपुरात पाहायला मिळत आहे.
शहरातून रामभक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली असून हाती भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केले आहेत.अनेक सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन केले आहे.