नागपूर: देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. राखी सणासाठी गेल्या आठवड्याभरापासून लाडक्या बहिणींनी तयारी केली होती.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त-रक्षाबंधन दिवशी भद्राकाळ असल्याने राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा दुपारनंतर सुरू होतो.
कधी आहे भद्राकाळ (Bhadra Kaal):18 ऑगस्टला रात्री 2 वाजून 21 मिनिटांपासून ते 19 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत ‘भद्राकाळ’ आहे.रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असतो. या काळात राखी बांधनं वर्जित असतं. या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला 1 वाजून 24 मिनिटांपर्यंत भद्राकाळ आहे. त्यामुळं भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा मुहूर्त असेल. त्यामुळं बहिणींनी भद्राकाळ संपल्यानंतर भावाला राखी बांधावी.
राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त : 19 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 26 मिनिटं ते सायंकाळी 6 वाजून 25 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.