Published On : Mon, Aug 20th, 2018

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी दिली सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा

Advertisement

मुंबई: दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या चौऱ्याहत्तराव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना सद्‌भावना दिवस प्रतिज्ञा दिली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा राज्यपालांनी उपस्थितांना दिली.

Advertisement
Advertisement

सुरुवातीला राज्यपालांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके तसेच राजभवन येथे कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement