Published On : Sat, Aug 31st, 2019

पोलिस एक प्रज्ञावंत भूमिकेचा शिलेदार-एसीपी राजेश परदेसी

Advertisement

कामठी:-‘सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय ‘हे ब्रीद वाक्य वापरून शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची मुख्य जवाबदारी पोलिसवर्ग पार पाडत असतात तसेच या पोलीस खात्यात कार्यालयीन अभ्यास व कर्तव्यदक्ष भूमीकेचा अनुभव हा लपवता येत नाही तर कार्यालयीन वेळेत प्राप्त झालेला ज्ञानाची शिकवण ही रिक्त ठिकाणी पर्यायी म्हणून नियुक्त झालेल्या सहपाठी कर्मचारीला सांगणे हे गरजेचे असते तर वरिष्ठांच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची त्यांच्या अनूभवाच्या शिकवणीची अत्यंत गरज असते यावरून प्राप्त ज्ञानाला आपल्यापुरते न ठेवता त्याचा प्रसार करून पुढच्याला ज्ञानार्जन करून देणे म्हणजे प्रज्ञावंत कार्य आहे त्यामुळे पोलिस हा एक प्रज्ञावंत भूमिकेचा शिलेदार असल्याचे मनोगत कामठी पोलिस स्टेशन चे सहाययक पोलीस आयुक्त राजेश परदेसी यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन ला आयोजित सेवानिवृत्तीपर सत्कार व भावपूर्ण निरोप समारंभ कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले याप्रसंगी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांनी सुद्धा समयोचित असे वक्तव्य केले.

पोलीस खात्यात 32 वर्षे नोकरी करून नवीन कामठी पोलिस स्टेशन येथे हेड मोहरर म्हणून कार्यरत असलेले सहाययक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश ताथोडे यांचा सेवानिवृत्तीपर एसीपी राजेश परदेसी व पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांच्या शुभ हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला.याप्रसंगी नुकतेच पदोन्नती प्राप्त झालेले एपीआय प्रशांत साखरे,महिला पोलिस उपनिरीक्षक निरंजना उमाळे, पोलिस उपनिरीक्षक रोहित कांडेकर, पोलिस उपनिरीक्षक धोंगडे,पोलिस उपनिरीक्षक मुंडे, सहाययक फौजदार धोटे, पेशने, पो हवा पप्पू यादव,मंगेश लांजेवार,दिलीप कुमरे,महेश नायक, अमृ, सुजाता , मयूर , ओमप्रकाश खंडाते, नांदेश्वर, राजा टाकळी कर, सुधीर कनोजिया आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मयूर बन्सोड यानि केले तर आभार ओंमप्रकाश खंडाते यांनी मानले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.