Published On : Sat, May 1st, 2021

राजेंद्र मुळक यांनी उपजिल्हा रुग्णालयात दिली भेट

– मिनी व्हेंटिलेटर संच तसेच कोवीड केअर करिता वैदकिय सामग्री दिली उपलब्ध करून

रामटेक -रामटेक येथिल शासकिय उपजिल्हा रुग्णालयात मंत्री तथा अध्यक्ष , नागपुर जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमेटी चे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक ,यांनी भेट देवूण रूग्णालयाची पहाणी केली व अत्यावश्यक गरजेच मिनी व्हेंटिलेटरचा संच तसेच कोव्हिड केअर व्यवस्थापना करीता आवश्यक व गरजेचे विविध वैद्यकिय सामग्री उपलब्ध करूण दिली .

यात प्रामुख्याने – मिनी व्हेंटिलेटर संच ,सॅनिटायझर , फेस मास्क कव्हर, टेंम्प्रेचर गन, ऑक्सिमिटर, स्टिमर मशिन, मास्क एन -95, हॅन्ड ग्लोज
यांचा समावेश आहे .यावेळी राजेंद्र मुळक यांचे सहित रामटेक शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक दामोदर धोपटे,पंचायत समिती,रामटेक च्या माजी सभापती कला ठाकरे ,रामटेक शहर युवक कॉग्रेस कमिटी अध्यक्ष राहूल कोठेकर,जेष्ठ कॉग्रेस कार्यकर्ते सागर धावडे उपस्थित होते..