Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘राजरत्न पुरस्कार २०२६’ सोहळा;१४ फेब्रुवारीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान

Advertisement

नागपूर – श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणारा ‘राजरत्न पुरस्कार २०२६’ येत्या १४ फेब्रुवारी रोजी नागपुरात प्रदान करण्यात येणार आहे. सिनीयर भोसला पॅलेस, महाल येथे सायंकाळी ६ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात नामांकन प्राप्त झाली होती. प्रतिष्ठानने निश्चित केलेल्या निकषांनुसार निवड समितीने विचारविनिमयानंतर सहा मान्यवर व्यक्ती आणि १८ वर्षांखालील दोन बालप्रतिभांची निवड केली आहे. पत्रकारिता व मीडिया क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई येथील विजय साळवी, साहित्य व इतिहास क्षेत्रातील योगदानासाठी नागपूरच्या प्रा. सौ. विजया मारोतकर, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पुण्याचे सागर कांबळे, संगीत व वादन क्षेत्रातील योगदानासाठी नागपूरच्या डॉ. सौ. संगीता राऊत, छायाचित्रण व दूरचित्रवाणी पत्रकारितेतील कार्यासाठी नागपूरचे विनय शुक्ला तसेच विशेष सामाजिक कार्यासाठी यवतमाळचे संदीप शिंदे यांचा ‘राजरत्न पुरस्कार’ाने गौरव करण्यात येणार आहे.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याशिवाय १८ वर्षांखालील बालप्रतिभांमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी नागपूरच्या कुमारी क्रिशा रितेश सोनी हिला तसेच विशेष कार्यासाठी कुमारी मधुरा राजेश मेहर हिला सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार विविध ऐतिहासिक स्मृतींना समर्पित स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे भूषविणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेशच्या कॅबिनेट व लोकस्वास्थ्य यांत्रिकी मंत्री संपत्तीया उईके यांच्या हस्ते होणार आहे. तसेच भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (पंचम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व माध्यम प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले असून, निमंत्रण पत्रिका देण्यात आल्याची माहिती राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष राजे मुधोजी भोसले यांनी दिली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement