नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने आज ते नागपुरात दाखल झाले.यावेळी विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढली.
वरळीत 37 ते 38 हजार आमचे मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कसे होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे. लोक माझ्या हाती सत्ता देतील. पत्रकारांनी राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का?असा प्रश्न केला.
महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ, असे राज ठाकरे म्हणाले. लोकसभेची वाफ आता निघून गेली आहे.
लोकसभेला 400 पारच्या घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम आणि दलित समाजाने एकजूट होत मतदान केले. हे मतदान अँटी मोदी आणि अँटी शाह असे होते.मात्र विधानसभा निवडणुकीला चित्र वेगळे असल्याचे राज ठाकरे म्हणाले.