Published On : Tue, Apr 9th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राज ठाकरे या वाघासारख्या माणसाचा कोल्हा करण्याचा प्रयत्न;विजय वडेट्टीवार यांचा निशाणा

Advertisement

नागपूर : राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसेचा आज मुंबईत गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तत्पूर्वी या मेळाव्या अगोदर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Gold Rate
June 22 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,800 /-
Gold 22 KT ₹ 1,35,300 /-
Silver/Kg ₹ 2,28,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज ठाकरे हा वाघ माणूस आहे. पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला. राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाहीत, असे ते सांगत होते. आता त्यांनाच दिल्लीची वारी करुन यावे लागत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम होते आहे का? त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम होतेय का? अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेला येत आहे. राज ठाकरे आज जी भूमिका मांडतील ती कदाचित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नसेल,असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

मात्र मला असे वाटते की राज ठाकरे दिल्लीच्या पुढे कधी झुकणार नाहीत, ही मराठी माणसांची अपेक्षा आहे. त्यामुळे ते आज जे बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

🏆 BEST OF NAGPUR 2026
Which School Ranked #1?
Explore Rankings →

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

तालाब या प्लॉटिंग?उमरेड के गोपाला तालाब पर बड़ा सवाल

तालाब या प्लॉटिंग?उमरेड के गोपाला तालाब पर बड़ा सवाल

साइबर फ्रॉड रैकेट का बड़ा खुलासा #cybercrime #fraud #crime #amravati #news #maharashtranews

साइबर फ्रॉड रैकेट का बड़ा खुलासा #cybercrime #fraud #crime #amravati #news #maharashtranews

ज्वेलरी दुकान से 2 लाख के सोने के आभूषण चोरी, महिला गिरफ्तार #nagpurnews #crime #stolen #jwellery

ज्वेलरी दुकान से 2 लाख के सोने के आभूषण चोरी, महिला गिरफ्तार...

कामठी में पागल कुत्ते का आतंक #nagpurnews #kamthi #dogbiting #newsupdate

कामठी में पागल कुत्ते का आतंक #nagpurnews #kamthi #dogbiting #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges