Published On : Tue, Oct 30th, 2018

वल्लभभाईंना तरी कसे पटेल?; राज ठाकरेंचा पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींवर हल्लाबोल

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ अर्थात सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळयावरुन मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. त्यांनी या विषयासंदर्भात व्यंगचित्र काढलं आहे.

वल्लभभाईंना तरी कसे पटेल, असं कॅप्शन या व्यंगचित्राला देण्यात आलं आहे. तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका खर्च करण्याऐवजी जी जिवंत माणसं आहेत ती जगवा, असं वल्लभभाई म्हणत असल्याचं दाखवण्यात आलंय.

मोदी सरकारने नर्मदेवरील सरदार सरोवराजवळ सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला आहे. 2290 कोटी रुपये या पुतळ्याच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आलेत.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे.