Published On : Tue, Apr 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जिल्ह्यासाठी पाऊस, वादळी वारा, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

Advertisement

भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये दिनांक २४ एप्रिल ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत वादळीवारा, वीज व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधी करिता येलो अलर्ट जारी केला आहे, तथापि २५ एप्रिल २०२३ करिता Orange Alert दिलेला असून या दिवशी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी वादळीवारा, वीज गर्जना व गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

या अनुषंगाने नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठया मधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.

Advertisement

जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
संपर्क क्र: ०७१२-२५६२६६८

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.