Published On : Wed, May 22nd, 2019

प्रविण डुमरे यांची रेल्वेने कटुन आत्महत्या की हत्या ?

कन्हान: नागपुर हावडा रेल्वे लाईन वरील चारपदरी बॉयपास रिंग रोड च्या पुलाखाली रेल्वे रूळावर प्रविण डुमरे चा छिन्नभिन्न मु्त्युदेह मिळाल्याने रेल्वेने कटुन आत्महत्या की हत्या ? अशी चर्चेतुन संसय व्यकत होत आहे .

मंगळवार (दि.२१) ला सकाळी ९.३० वाजता गहुहिवरा रोड कडील नागपुर हावडा रेल्वे लाईन वरील चारपदरी बॉयपास रिंग रोड च्या पुलाखाली रेल्वे रूळावर प्रविण रामचंद्र डुमरे वय ३८ वर्ष मु हनुमान नगर कन्हान व हल्ली मु मौदा यांचा छिान्न भिन्न मुत्युदेह मिळाला. बाजुलाच त्याची बजाज दुचाकी क्र एम एच ४० ए बी ०५५० उभी ठेवली होती. रेल्वे पोलिसांनी कन्हान पोलीसाना माहीती दिल्यावर घटनास्थळी पोलीसांनी तपास केला असता प्रविण डुमरे चा मुत्युदेह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या कन्हान च्या घरी कळवुन नातेवाईकांना बोलवुन पंचनामा करून मुत्युदेहाचा करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी ७.३० वाजता शोकाकुल वातावरणात कन्हान नदीवर अंतिम करण्यात आला.

प्रविण रामचंद्र डुमरे वय ३८ वर्ष मु हनुमान नगर कन्हान येथील रहिवासी असुन तो एन टी पी सी मौदा येथे ठेकेदारी मध्ये नौकरी करित असल्याने आपल्या पत्नी व मोठा मुलगा १० वर्ष, लहान मुलगा ३ वर्ष या दोन मुला सह मौदा येथे हल्त्ली राहत होता. त्याचे आई वडील, मोठा भाऊ हनुमान नगर कन्हान येथे राहत आहे. सोमवार (दि.२०) ला प्रविण, पत्नी सुनिता व लहान मुलासह कन्हान च्या घरी आला होता. सायंकाळी भाची ला घेऊन पत्नीच्या आग्रहाने परत मौदा ला गेले. सकाळी ९.३० वाजता कन्हान पोलीसा कडुन मोठा भाऊ विनोद सांगितले की गहुहिवरा रोड कडील नागपुर हावडा रेल्वे लाईन वरील चारपदरी बॉयपास रिंग रोड च्या पुलाखाली प्रविण रेल्वे रूळावर कटले ल्या छिन्नभिन्न अवस्थेत मिळाल्याची माहीती मिळाली.

प्रविण मौदा ला घरी गेल्यावर रात्री पती पत्नी मध्ये पैश्याच्या करिता भांडण झाले.व प्रविणचा एक मित्र घरी येऊन भाडंण करून गेला. माझे पती कधी कधी दारू पिऊन चिंतेत राहायचे. विचारल्यास भांडण करायचे मी मरून जाईल असी धमकी दयाचा. रात्री सुध्दा पैशाच्या कारणावरून दोघांत भांडण झाले व मी आपल्या जिवाचे काही करून घेईल म्हणुन पत्नी व आपला मोबाईल घेऊन दुचाकी ने घरून निघुन गेला. या बाबत पत्नी सुनिता डुमरे हयानी रात्री उशिरा मौदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. आज कन्हान पोलीस स्टेशनला पत्नी सुनिता डुमरे ने पती पत्नी मध्ये भांडण होऊन पैशाच्या तकादा वरून प्रविण ने आत्महत्या केली असावी. अशी तक्रार दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहे.

सायंकाळी कन्हान वरून मौदा प्रविण आपल्या परिवारासह गेल्यावर सकाळी कन्हानच्या चारपदरी बॉयपास रिंग रोड च्या पुलाखाली रेल्वे रूळावर प्रविण डुमरे चा छिन्नभिन्न मु्त्युदेह मिळाल्याने प्रविण डुमरे ची आत्महत्या की हत्या केल्याचा संसय नागरिकांत चर्चेतुन व्यकत करण्यात येत आहे.