सुरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणाच्या खटल्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधातील राहुल गांधींचा अर्ज सुरत न्यायालयाने फेटाळला आहे. सुरत कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात राहुल गांधी आता उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरतच्या सत्र न्यायालयात याअगोदर या प्रकरणी 13 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता.
राहुल गांधी यांनी बंगळुरू येथील रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात विधान केले होते. प्रत्येक चोराचे आडनाव मोदी का असते, असे राहुल गांधी सभेत म्हणाले होते. या वक्तव्याच्या विरोधात गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी मानहानीचा दावा दाखल केला. यावर्षी 23 मार्च रोजी न्यायालयाने पूर्णेश मोदी यांच्या याचिकेवर निकाल दिला आणि दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली.
Amravati Breaking News: 1,925 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जब्त #AmravatiNews #PlasticBan #PlasticFree
20 जुलाई को दिल्ली जाएंगे उद्धव ठाकरे #UddhavThackeray #SonamWangchuk #ShivSenaUBT #Politics #news
नागपुर में तेज रफ्तार बाइक का कहर! #NagpurNews #RoadAccident #AccidentNews #PoliceAction #CCTV
नागपुर में नाबालिग से यौन शोषण का आरोप #NagpurNews #Hudkeshwar #CrimeNews #POCSO...
शिक्षक ने परिवार संग गोदावरी में लगाई छलांग #maharashtranews #nanded #newsupdate #maharashtra
नागपुर में तेज रफ्तार ST बस का कहर #NagpurNews #STBus #RoadAccident #accident...





