Published On : Sat, Dec 16th, 2017

खा. राहूल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

Advertisement


मुंबई: अखिल भारतीय काँगेस कमिटीचे नुतन अध्यक्ष खा.राहूल गांधी यांनी आज दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. राहूल गांधी यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारताच मुंबईसह राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे माजी खा.एकनाथ गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रदेश सचिव सय्यद जिशान अहमद यांच्यासह उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.