Published On : Sat, Dec 16th, 2017

राहुल गांधीं नी पदभार स्वीकारला युवक कांग्रेस चा जल्लोश व गंगाजल वितरण कार्यक्रम

Gangajal Distribution
नागपूर: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी आज पदभार स्वीकारला या निमित्याने तसेच नागपूर लोकसभा युवक कांग्रेस सोशल मीडिया सेल चे प्रभारी स्वप्निल बावनकर यांच्या वाढदिवसापित्यर्थ गणेशपेठ आग्याराम देवी चौक येथे नागपूर लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके व प्रभागाच्या नगरसेविका हर्षलाताई साबले यांचे हस्ते निःशुल्क गंगाजल वितरण करण्यात आले.

संघ ते मोदी जनचेतना यात्रा बाईक रैली च्या माध्यमातून वाराणसी हुन आणलेले पवित्र गंगाजल निःशुल्क वितरण करण्याच्या मागे कारण असे की आर.स.स,विश्व हिन्दू परिषद व भाजपच्या मंडळीनी गंगाजल चे शुल्क नागरिकाकडून वसूल केले या जनचेतना यात्रा बाईक रैली च्या यशस्वी आगमनानंतर आज २२वा गंगाजल वितरण कार्यक्रम अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदभार स्विकारल्यामुळे घेण्यात आला. राहुलजी अध्यक्ष झाल्यामुळे नवयुवकात चैतन्य निर्माण झाले युवक कांग्रेस चे अध्यक्ष व नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या नेतृत्वात फटाके फोडून आतिशबाजी, ढोलताशे वाजवून जलोष करीत आनंद व्यक्त केला.

बंटी शेळके म्हणाले की राहुल जी अध्यक्ष झाल्यामुळे पक्ष अधिक सक्रिय होईल व संघटना मजबूत होईल व पक्षाला चांगले दिवस येईल गंगाजल वितरण कार्यक्रमाला परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रामुख्याने नगरसेविका हर्षलाताई साबले, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महेश श्रीवास, युवक काँग्रेसचे महासचिव आलोक कोंडापुरवार, प्रभाग अध्यक्ष अब्दुल नियाज, अक्षय घाटोले, हेमंत कातुरे,स्वप्निल बावनकर, सौरभ शेळके, राजेन्द्र ठाकरे, सागर चव्हाण, वसीम शेख, गणेश शर्मा, आशीष लोनारकर,सूरज तडस, पूजक मदने, अतुल मेश्राम, स्वप्निल ढोके, नितिन गुरव, कुणाल जोध,नितिन सुरुशे, सूरज तडस, कुश दुबे, हर्षल धुर्वे, प्रवीण टुले, आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते.