Published On : Thu, Mar 12th, 2020

रागीट महाविघालयाचा राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

रामटेक:- कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय रामटेक ,व्दारा राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिर मुसेवाडी या गावामध्ये संस्था अध्यक्ष रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा दिवसीय शिबीर घेण्यात आला.

नुकतेच शिबिराचे उघाटन .श्रीनंदा धुर्वे सरपंच ग्रामपंचायत मुसेवाडी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या शिबिरामध्ये एकुण 25 विघार्थी होते . या सहा दिवसात रोज सकाळी लवकर उठून गावात प्रभातफेरी काढुन नंतर ग्रामसफाई, झाल्यावर मुलांना चहा ,नाश्ता होत होता .

आंगोळ आटपून सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. नंतर विश्रांती घेऊन.बौद्धिक कार्यक्रम घेण्यात येत होते. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंधश्रद्धा निर्मुलन यावर आधारित नाटक, तसेच पथनाट्य, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा, झाडे जगवा, व्यसन मुक्ती, दारू बंदी, ईत्यादी आधारावर नाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

निवासाची व्यवस्था सरपंच श्रीनंदा धुर्वे यांनी ग्रामपंचायत मध्ये करून दिली होती. गावातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शिबिराचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. दिलीप गिरडे,प्रा.चेतना उके,प्रा.शालू वानखेडे, प्रा.अनिल मिराशी, प्रा.प्रेमानंद हटवार, प्रा.सरपाते.यांचे मोलाचे सहकार्य लाभले.