नागपूर:नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने आज पौर्णिमेनिमित्त ‘पोर्णिमा दिवस’ अंतर्गत विधान भवन चौकात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विधान भवन परिसरातील व्यावसायिकानी यावेळी अनावश्यक वीज दिवे बंद करून ऊर्जा बचतीचा संदेश दिला.
यावेळी मनपाचे कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, सहायक अभियंता अजय मानकर, श्री. बेग, श्री. नवघरे, ग्रीन विजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चैटर्जी, सुरभी जैस्वाल, विष्णुदेव यादव व अन्य उपस्थित होते. यावेळी ग्रीन विजीलच्या स्वयंसेवकांनी उर्जाबचतीचे महत्त्व पटवून देत पौर्णिमा दिवसाविषयी माहिती दिली. आ. प्रा. अनिल सोले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून सुरु असल्याचे ग्रीन विजीलचे संस्थापक कौस्तभ चैटर्जी यांनी सांगितले. अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन यावेळी स्वयंसेवकांनी केले. या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी आणि छोट्या व्यावसायिकांनी अनावश्यक वीज दिवे बंद केले.
स्वयंसेवकांनी सिग्नलवर उभ्या वाहन चालकांनाही या दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
