Published On : Fri, Oct 6th, 2017

पोर्णिमा दिवस जनजागृती मोहीम बनली “लोक चळवळ” – आ. प्रा. अनिल सोले

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हीजील फाऊंडेशनच्यावतीने पोर्णिमा दिनानिमित्त उर्जा बचतीसाठी राबविण्यात येत असलेले जनजागृती अभियान आता लोक चळवळ बनली आहे. नागरिक स्वतः यामध्ये सहभागी होऊन इतरांमध्येही याबद्दल जनजागृती करत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.

गुरुवारी (5 ऑक्टोबर) रोजी रात्री 8 ते 9 दरम्यान पंचशील चौक येथे उर्जाबचतीबद्दल जनजागृती करण्यात आली. प्रामुख्याने माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोनच्या सभापती रुपा राय, मनपा विधी समितीच्या सभापती मिनाक्षी तेलगोटे, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, उज्जवला शर्मा, नगरसेवक किशोर वानखेडे, ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे कौस्तुव चॅटर्जी उपस्थित होते.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे आ. अनिल सोले म्हणाले, “शहरभरात पोर्णिमा दिनानिमित्त अनावश्यक विद्यूत दिवे बंद ठेवून तसेच मनपाचे पथदिवे बंद ठेवून पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येतो, शहरातील एका छोट्या चौकातून सुरु झालेली ही मोहिम आता लोकचळवळ बनली आहे. या द्वारे आतापर्यंत सुमारे 1 लक्ष 24 हजार युनिट्सची बचत झाली आहे. ही कौतुकाची बाब आहे.”

“पारंपारिक पद्धतीने उर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती खर्च होते. उर्जेची बचत केल्यास नैसर्गिक खनिज संपत्तीचेही जतन करणे शक्य होईल. तसेच उर्जा बचत ही काळाजी गरज बनली असून प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन उर्जा बचत करावी असे आवाहन यावेळी माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके य़ांनी केले.

उपक्रमाच्या प्रारंभी स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये जाऊन पोर्णिमा दिनानिमित्त राबविण्यात येणा-या अभियानाची माहिती दिली. तसेच आपणही प्रत्येक पोर्णिमेच्यादिवशी 1 तास अनावश्यक विद्यूत उपकरणे बंद ठेवून अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. स्वयंसेवकांच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. गुरुवारी पोर्णिमा दिनानिमित्त शहरभरात 2695 युनिट्सची बचत झाली. पंचशीच सिनेगृहानेही अभियानात सहभागी होऊन 1 तास संपूर्ण अनावश्यक दिवे बंद ठेवले हे विशेष. यावेळी मनपा विद्यूत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनविस, उपअभियंता सलीम इकबाल, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, तांत्रिक सहायक सुनिल नवघरे, पंचशील सिनेगृहाच्या प्रभोदकुमार मुनोत व व्यवस्थापक राजा लहरिया यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरभी जयस्वाल, मेहूल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शितल चौधरी, विकास यादव आदींनी परीश्रम घेतले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement