Published On : Fri, Feb 14th, 2020

पुरी एक्सप्रेस च्या धडकेने तरुण मजुराचा जागीच मृत्यू

Advertisement

कामठी :- स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आजनी रेल्वे फाटक जवळील रेल्वे की मी क्र 1115/14अंतरावर नागपूर हुन पुरी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या पुरी एक्सप्रेस साप्ताहिक रेल्वे गाडी ने त्याच रेल्वे रुळाहून कानात हेडफोन घालून पायदळ येणाऱ्या तरुणाला दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा धड गेल्याने घडलेल्या गंभीर अपघातात के सी सी बिल्डकॉन कंपनीच्या रस्ता बांधकामात कंत्राटी पद्धतिने काम करणाऱ्या मजूर तरुणाचा जागीच दुर्दुवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव किशन रामाधीन धुर्वे वय 25 वर्षे रा.छपारिका जी.कवरधा राज्य छत्तीसगढ असे आहे.

सदर अपघाती मृतक हा के सी सी बिल्डकोन कंपनीत कंत्राटी पद्धतीत मजूर म्हणून कामावर असून ड्रॅगन पॅलेस भुयार पुलिया जवळील रस्ता बाबधकामात मजूर म्हणून कार्यरत होता .तसेच उंटखाना जवळील मोकळ्या ओसाड जागेत तंबू घालून वास्तव्यास होते आज दैनंदनरित्या दुपारी जेवण करून पुनश्च कामावर जाण्यासाठी कानात हेडफोन घालून पायदळ जात असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेल्वे गाडीने हॉर्न देऊनही सदर तरुणाला ऐकू न गेल्याने घडलेल्या रेल्वे गाडीच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस शैलेश मेश्राम यांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले .पोलिसांनी यासंदर्भात घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.