File Pic
नागपूर: अनेक देशांनी घुसखोरीविरुद्ध कडक कायदे करुन प्रतिबंध घातला असतांना नागपूरातील ६० युवकांनी चक्क पोलिसांच्या सहकार्याने बनावट कागदपत्रांसह पालकांना उभे करुन अधिकृत पासपोर्ट व व्हिसाद्वारे इंग्लंडमध्ये घुसखोरी केल्याचे उघडकीस येताच देशभरात खळबळ उडाली आहे. या रॅकेटचे मुळ पंजाबामध्ये असून त्यांनी देशभरात आपले जाळे पसरविल्याचे समोर येत असल्याने सुरक्षा यंत्रणेने त्या दिशेने तपास सुुरु केला आहे.
या रॅकेटने इंग्लंडच नव्हे तर इतरही देशात बनावट पद्धतीचा अवलंब करीत जरीपटका व पाचपावली पोलिसांच्या पोलिस व्हेरिफीकेशन चा फायदा घेत पासपोर्ट व व्हिसा प्राप्त केल्याचे सांगितल्या जाते. या युवकांमध्ये काही जण पंजाबसह इतर राज्यातील रहिवासी असल्याचे, तसेच काहींवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची चर्चा आहे. नियमानुसार गुन्हे दाखल असलेला, त्यात नागपूर बाहेरील रहिवासी असलेल्या व्यक्तीला येथून पासपोर्ट मिळणे शक्य नाही. मात्र या रॅकेटच्या मुख्य सुत्रधारांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने पासपोर्ट व व्हिसा प्राप्त करुन दिला. यावरुन तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह कर्मचाNयांनी मौका चौकशी न करता चिरीमिरी घेऊन केवळ कार्यालयात बसून `पोलिस व्हेरीफिकेशन’ केल्याचे यानिमित्ताने समोर आले.
बेपत्ता झालेले युवक केवळ इंग्लंडमध्येच नव्हे तर फ्रान्स, जपान, इटली, कॅनडासह अन्य देशांतही पाठविल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती समोर येत आहे. विदेशात मानवी तस्करीचे मूळ पंजाब राज्यात आहे. जरीपटक्यातील अटवाल कुटूंबाचे काही नातेवाईक पंजाबमध्ये आहेत.
एक- दोन नव्हे तर तब्बल ६४ तरूणांना बनावट पासपोर्ट, व्हिसावर विदेशात नेण्यात आले. नागपुरातील युवकांच्या तस्करीची किंमत लाखोंमध्ये जरी असली तरी संपूर्ण देशांतील आकडा खूप मोठा आहे. आरोपींमध्ये कायद्याचे ज्ञान असणारा अॅड. शिवकुमार राठोड या वकीलाचाही समावेश असून त्यानेच संपूर्ण कागदपत्रांची प्रक्रिया केल्याची उघडकीस आले आहे.
राजेंद्रसिंग अटवाल-पत्नी गुरूमीत कौर अटवाल, रूलडासिंग गुज्जर-पत्नी परमीतकौर गुज्जर, जर्नल सिंग-पत्नी सुरींदर कौर, पिअरा सिंग-पत्नी जालींदर कौर, सतवीरसिंग गोध्रा-पत्नी परमवीर कौर, मंजीत सिंग धोतरा-पत्नी गुरूमीत कौर, निशांत सिंग धोतरा-पत्नी सतवन कौर, काश्मिर सिंग-पत्नी मनजीत कौर, अजीत सिंग-पत्नी निर्मल कौर, बलविरसिंग मुलताना-पत्नी जसविंदर कौर सर्व रा. टेका नाका, पाचपावली यांना पहिल्याच दिवशी अटक केली होती तर अॅड. राठोड याला मंगळवारी अटक करण्यात आली. अॅड. शिवकुमार राठोडला आज न्यायालयात उपस्थित केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यालयाने दिले.
मानवी अवयवाच्या तस्करीचा संशय
ड्रायव्हर, झाडूवाला, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कारखान्यात कामगार तसेच घरातील कामे करण्यासाठी घरगडी अशा कामांसाठी देशभरातून युवकांना विदेशात नेण्यात येते. त्यासाठी युवकांच्या कुटूंबीयांना मोबदला देण्यात येते. त्या युवकांची विदेशात होणाNया मानवी तस्करीचे केंद्र जरी पंजाब असले तर तेथून देशातील जवळपास सर्वच राज्यात यांचे रॅकेट काम करते. त्यामुळे हजारो तरूणांना विदेशात नेण्यासाठी संपूर्ण रॅकेट बनावट पासपोट-व्हिसा पासून ते शाळांचे दाखले, जन्म-वयाची दाखले तसेच अन्य कागदपत्रे तयार करून देतात. मात्र इंग्लंडमधून ५० युवक अचानक बेपत्ता झाल्याने या रॅकेटचा मानवी अवयवाच्या तस्करीशी संबध असल्याचा संशय बळावला आहे.