Published On : Sat, Feb 3rd, 2024

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा वैयक्तिक कारणामुळे राजीनामा !

Advertisement

नागपूर: पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.आप सरकार आणि राज्यपाल यांच्यात मागच्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता.अशात आता राज्यपालांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यातच पुरोहित यांनी हा राजीनामा वैयक्तिक कारणामुळे दिला असल्याची माहिती आहे.

पंजाबचे 36 वे राज्यपाल म्हणून त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये शपथ घेतली.राजकीय कारकिर्दीत त्यांना तीन वेळा लोकसभेचे खासदार पद मिळाले आहे. पत्रकारिता क्षेत्रातही बनवारीलाल पुरोहित यांनी काम केले आहे.बनवारीलाल पुरोहित यांचा 16 एप्रिल 1940 रोजी जन्म झाला.

त्यांचे शालेय शिक्षण नागपूर आणि राजस्थानच्या बिशप कॉटन स्कूलमधून पूर्ण झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे.पुरोहित यांना प्रख्यात शिक्षणतज्ञ, प्रसिद्ध समाजसेवक आणि राष्ट्रवादी विचारवंत म्हणून ओळले जाते.