Published On : Sat, Jun 16th, 2018

पुणे बातम्या: महिला पोलिसाला धमकी दिल्याप्रकरणी मनसे आमदाविरुद्ध गुन्हा

पुणे-महिला पोलिस अधिकार्‍याला;याला धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्याविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आमदार सोनवणे यांच्यावर आरोप आहे.

सोनवणे हे जुन्नर विधानसभामतदार संघातून निवडून आलेले मनसेचे राज्यातील एकमेव आमदार आहेत. महिला पोलिस अधिका-याच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलिस निरीऎक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याची बेकायदेशीर रेशनिंगच्या गव्हाची वाहतूक करणारी पिकअप पकडून कारवाई केली.

याचा राग आमदारांना आला. ते पोलिस ठाण्यात आले आणि डमाळे यांना पोलिस स्टेशनला जमलेल्या 50-55 लोकांसमोर अर्वाच्य भाषेत अपमानित केले. शिवाय डमाळे यांच्या अंगावर ते धावून गेले. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळे यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या विरोधात भा.दं.वि.क.353,509,186,294 नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.