नागपूर : अयोध्या नगरी येथे प्रभू श्री राम चंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. या शुभ कार्याचे औचित्य साधून, दक्षिण-पश्चिम मंडळाचे महामंत्री, माजी शिक्षण सभापती व माजी नगरसेवक दिलीप दिवे यांच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
Featured Products
या प्रसंगी आमदार प्रविणजी दटके, दक्षिण-पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रितेशजी गावंडे, किशोरजी वानखेडे, नितीनजी महाजन, कल्पनाताई तडस, वर्षाताई चौधरी, प्रदीपजी चौधरी, राजेंद्रजी अग्रवाल, संदीपजी कुलकर्णी, काजलताई बागडी, मेधाताई पंडित, प्रणालिताई धर्माधिकारी, धनंजयजी तापस, जीवनजी मुदलियार, राम सुब्रमण्यम प्रीतीताई शुक्ला, विनोदजी पांडे, अक्षय जोध, सनी पांडे, सिद्धेश नाजपांडे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement









