Published On : Tue, Nov 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर; राज्य सरकारचा आदेश जारी

Advertisement

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच, राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते. आता, राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करत 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार, क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये

महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-२०२४ च्या अनुषंगाने बुधवार दिनांक २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.