Published On : Wed, Oct 13th, 2021

‘ ई-कचरा’ व्यवस्थापन या विषयावर नागपूरच्या सीपीडब्लूडी रहिवासी कॉलनीमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर: नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित केंद्र शासनाच्या केंद्रीय लोकनिर्माण विभाग – सीपीडब्ल्यूडी रहिवासी कॉलनी परिसरात नुकतेच ‘ई-कचरा’ व्यवस्थापन या विषयावर एका जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सीपीडब्ल्यूडी कॉलनी टाईप 5 मधील रहिवाशांना रितू अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या जनजागृती चर्चेद्वारे कचरा व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात आली. आपल्या घरांमध्ये आणि उद्योग- आस्थापनामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरल्यानंतर फेकून दिल्या जातात त्याला इलेक्ट्रॉनिक कचरा- ई-कचरा म्हणतात. जेव्हा हा कचरा योग्यरित्या गोळा केला जात नाही तेव्हा रोग्य आणि पर्यावरणासाठी समस्या उद्भवतात, अशी माहिती पर्यावरण अ‍भ्यासक शेफाली दुधबडे यांनी यावेळी दिली .

प्लास्टिक आणि काचेच्या व्यतिरिक्त, ई-कचऱ्यामध्ये कॅडमियम, शिसे, पारा यासारख्या धोकादायक रसायनांचे मिश्रण असते. ही हानिकारक रसायने जमिनीत प्रवेश करतात आणि जलाशयांना दूषित करतात. ई-कचरा जळल्यावर विषारी वायू हवेत सोडतात आणि वायू प्रदूषण वाढवते. यासाठी सुरीटेक्सचे वैभव सूरी यांनी ई-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच आभार प्रदर्शन अन्वितीच्या पूनम मिश्रा यांनी केले.यावेळी सीपीडब्लूडी कॉलनीचे रहिवासी तसेच इनर व्हील क्लब नागपूर पूर्वच्या अध्यक्ष डॉ उज्ज्वला मोहता आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते