Published On : Fri, Oct 26th, 2018

महाल टिळक पुतळा परिसरात ‘पोर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

एक तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन : मनपा-ग्रीन व्हिजीलचा पुढाकार

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २४) टिळक पुतळा, गांधी सागर, महाल परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. आमदार प्रा. अनिल सोले, ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चैटर्जी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या प्रसंगी नगरसेविका सुमेधा देशपांडे, कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, संजय भोसले, बंडू अपराजित, अजय मानकर, सुनील नवघरे, प्रशांत काळबांदे, श्रीकांत भुजाडे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमित शिंगरु, नरेश वाघमारे, सोमू देशपांडे, करण चिखले, प्रकाश अडवाणी, भाजपा युवा मोर्चा प्रभाग १८ चे महामंत्री निनाद दाणी, धीरज नैताम, रेणुका माने, करण लकपती, रोहित ठवरे, शशांक बुराडे, आकाश गटकिने आदी उपस्थित होते.

Advertisement

ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांनी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव बुधवारी (ता. २४) महाल परिसरातही पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला.

नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवकांनी महालमधील टिळक पुतळा, गांधी सागर व संपूर्ण परिसरात रात्री ८ वाजताच्या सुमारास नागरिकांच्या घरी व व्‍यापारी प्रतिष्ठानांमध्ये भेट देउन उपक्रमाविषयी माहिती दिली व अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याची विनंती दिली.

मनपा व ग्रीन व्‍हिजीलच्या या पुढाकाराला नागरिकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शवित स्वयंस्फुर्तीने अनावश्यक वीज उपकरणे बंद करून सहकार्य केले. शहरातील विविध ठिकाणी ग्रीन व्‍हिजीलचे स्वयंसेवकच जनजागृती करतात मात्र महाल परिसरात बुधवारी (ता. २४) भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनीही या उपक्रमात सहभागी होउन नागरिकांना विद्युत उपकरणे बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनीही प्रत्येक पोर्णिमा दिवसाला रात्री अनावश्यक विद्युत दिवे व इतर उपकरणे किमान एक तास तरी बंद ठेवण्याचे आश्वासन यावेळी दिले.

याप्रसंगी ग्रीन व्हिजीलचे सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, मधुसुदन चैटर्जी, विष्णुदेव यादव, कार्तिकी कावळे, दादाराव मोहोड आदी स्वयंसेवकांनी जनजागृती अभियानात सहभागी होउन परिसरातील नागरिकांना अनावश्यक विद्युत दिवे व उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement