Advertisement
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘पौर्णिमा दिवस’ अभियानाद्वारे ओंकार नगर चौकामध्ये जनजागृती करण्यात आली.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, पिनाकी बानिक, प्रतीक इसमपल्लीवार, जान्हवी पारस्कर यांच्यासह मनपाचे श्री. प्रकाश रुद्रकार, श्री. मोहन कोल्हे यांनी या अभियानात सहभाग नोंदविला. फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी व्यापारी बांधवांना एक तास विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला ओंकारनगर चौक परिसरातील व्यावसायिक, दुकानदार, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानात स्थानिक नागरिकांनी देखील उत्साहाने सहभाग नोंदवून मनपाला सहकार्य केले.