Published On : Fri, Aug 19th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘पौर्णिमा दिवसा’निमित्त सावरकर चौकात जनजागृती

Advertisement

– मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने बुधवारी (ता.१७) सावरकर चौक (ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक) परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. पौर्णिमा दिवसानिमित्ताने वीज बचतीच्या जनजागृतीची संकल्पना तत्कालीन महापौर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार अजूनही मनपा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे पौर्णिमा दिनानिमित्त शहरातील विविध भागात जनजागृतीचे आवाहन करण्यात येत आहे.

जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील दुकाने, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

Advertisement

ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, सुजय काळबांडे, पारस जांगडे, साक्षी मुळेकर, शुभम येरखेडे, तुषार देशमुख आदींनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, विप्लब भगत यांच्यासह भोलानाथ सहारे, संजय दबळी, उपेंद्र वालदे, गुरमीत सिंग, अनिल झोडे, संदीप मानकर आदींनीही सहभाग नोंदविला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.