Published On : Wed, Apr 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

‘पौर्णिमा दिवसा’निमित्त प्रतापनगर चौकात जनजागृती

Advertisement

मनपा-ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सोमवारी (ता.१८) प्रतापनगर चौक परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. यावेळी उपक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी नगरसेवक गोपाल बोहरे यांनीही या उपक्रमात सहभागी होउन नागरिकांना वीज बचतीचे महत्व पटवून दिले.

Gold Rate
Mar 6th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,61,200/-
Gold 22 KT ₹ 1,49,900 /-
Silver/Kg ₹ 2,68,700/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील दुकाने, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.

ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, सुजय काळबांडे, साक्षी मुळेकर, शुभम येरखेडे आदींनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत भोलानाथ सहारे, अनिल झोडे, हेमंत सावरकर, माया हाडे, भाग्यश्री चन्ने आदींनीही सहभाग नोंदविला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement