Published On : Mon, Oct 7th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पाच जणांवर मनोरुग्णाचा हल्ला; दोघांचा मृत्यू

Advertisement

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पाच जणांवर मानसिक रुग्णाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सोमवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, नागपूर रेल्वे स्थानकावर एका वेड्या व्यक्तीने ५ जणांवर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने धारदार शस्त्र आणि काठी घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर झोपलेल्या लोकांवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सर्वजण गंभीर जखमी झाले असून, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मानसिक रुग्ण होता. स्टेशनवर येणाऱ्या लोकांकडून भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे. मानसिक आजारी असल्याने तो कोणाशीही विनाकारण वाद घालत असे.घटनेच्या दिवशीही त्याचा इतर भिकारी आणि प्रवाशांशी वाद झाला होता. त्यानंतर त्याने प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या लोकांवर हल्ला केला. या गंभीर घटनेनंतर रेल्वे स्थानकावर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement