Published On : Wed, Jun 12th, 2019

सिमेंट रस्त्यात अडकलेली साडेआठ हजारांवर झाडे मोकळी

Advertisement

उर्वरित हजारावर झाडे होणार आठवडाभरात मुक्त

नागपूर : शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामात कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे अडकलेल्या दहा हजारांवरील झाडांपैकी तब्बल ८६९७ झाडांचे बुंधे मोकळे करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. आता केवळ हजारावर झाडे शिल्लक असून येत्या आठवड्यात त्यांची बुंधे मोकळी करण्यात येणार आहेत.

सिमेंट मार्गाच्या विळख्यातून बुंधे मोकळी करावयाच्या मोहिमेसंदर्भात आयुक्तांकडून वेळोवेळी बैठक घेउन आढावा घेण्यात येत आहे. यापुर्वी २८ मे रोजी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन आठवड्यात शिल्लक ३७१८ झाडांची बुंधे मोकळी करण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार एका आठवड्यात १९४३ झाडांची बुंधे मोकळे करण्याची मनपा प्रशासनाने यशस्वी कामगिरी केली. १७७५ झाडे बुंधे मुक्त करण्यासाठी शिल्लक असून यापैकी सुमारे ७५० झाडे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील आहेत.

वर्धा मार्ग, अमरावती मार्ग व छिंदवाडा मार्गावरील ही झाडे असून या झाडांची बुंधे मोकळे करण्यासंदर्भात वेळोवेळी मनपातर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही कोणतिही कार्यवाही करण्यात आली नाही. मनपाच्या अखत्यारितील हजारावर झाडे शिल्लक असून या आठवड्यात उर्वरित सर्व झाडे सिमेंट रोडच्या विळख्यातून मुक्त करण्यात येतील, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Advertisement

सिमेंट रोडच्या बांधकामात शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब लक्षात येताच आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने दखल घेत धोक्यात असलेल्या झाडांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. सर्वेक्षणाअंती शहरातील २५२३७ झाडांपैकी १४७६५ झाडे सुरक्षित आढळली. मात्र १०४७२ झाडांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे दिसून आले. यावर तातडीने कार्यवाही करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी झाडांची बुंधे लवकरात लवकर मोकळे करण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या मार्गदर्शनात सुरू असलेली ही मोहिम अंतिम टप्प्यात असून शहरातील सर्व झाडे मोकळा श्वास घेउ शकणार आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.