Published On : Wed, Jan 17th, 2018

राष्ट्रपतींकडून उल्लेखनीय सेवेसाठी जाहीर पोलिस पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान

Advertisement

मुंबई : पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेल्या ‘राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक’ व ‘पोलीस शौर्यपदक’, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकांचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज वितरण झाले.

पोलीस पदक वितरणाचा ‘अलंकरण समारंभ’ राज्यपालांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडला. याप्रसंगी गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिन 2015 रोजी घोषित केलेली एक राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक, 12 पोलीस शौर्यपदके, उल्लेखनीय सेवेबद्दल 7 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल 80 पोलीस पदक प्राप्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक

राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक कै. गणपत नेवरु मडावी, पोलीस हवालदार यांना मरणोत्तर जाहीर झाले होते. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना अतुलनीय कामगिरी त्यांनी केली होती. त्यादरम्यानच त्यांना वीरमरण आले. कै. गणपत मडावी यांच्या पत्नी श्रीमती मीना मडावी यांच्याकडे हे पदक प्रदान करण्यात आले.

पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी – कर्मचारी
कै. सुनील तुकडू मडावी (मरणोत्तर), पोलीस शिपाई, गडचिरोली यांच्या आई श्रीमती अनुसया तुकडू मडावी यांच्याकडे पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. कै. गिरीधर नागो आत्राम (मरणोत्तर), पोलीस नाईक, गडचिरोली यांच्या पत्नी श्रीमती छबीताई गिरीधर आत्राम यांच्याकडे पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. मोहंमद सुवेज महबूब हक, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. अन्य पोलीस शौर्यपदक प्राप्त अधिकारी – कर्मचारी पुढीलप्रमाणे – यशवंत अशोक काळे, पोलीस उपअधीक्षक, सातारा, अंकुश शिवाजी माने, सहायक पोलीस निरीक्षक, पुणे ग्रामीण, अतुल श्रावण तवाडे, सहायक पोलीस निरीक्षक, गडचिरोली, प्रकाश व्यंकटराव वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक, सोलापूर ग्रामीण, विनोद मेस्सो हिचामी, पोलीस नाईक, गडचिरोली, इंदरशहा वासुदेव सडमेक, पोलीस नाईक, गडचिरोली, सदाशिव लखमा मडावी, पोलीस नाईक, गडचिरोली, गंगाधर मदनय्या सिडाम, पोलीस नाईक, गडचिरोली, मुरलीधर सखाराम वेलादी, पोलीस नाईक, गडचिरोली.

उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक
कृष्णलाल बिश्नोई, सेवानिवृत्त महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, संजय एस. बर्वे, महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, विवेक फणसाळकर, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, अशोक दशरथ बगमारे, सेवानिवृत्त सहायक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, नागपूर, राजन महावीर पाली, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, प्राचार्य, अपांरपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर, अशोक शेषराव जोंधळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, हिंगोली, सदाशिव बाबुराव पाटील, सेवानिवृत्त सहायक पोलीस उप निरीक्षक, कोल्हापूर.

पोलीस पदक

डॉ. सुरेश मेकला, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, पुणे, सुहास वारके, पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. जय वसंतराव जाधव, पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, छगन सिताराम देवराज, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक,शशिकांत रामचंद्र माने, सेवानिवृत्त प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, निताराम झिंगाराव कुमरे, सेवानिवृत्त समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, नागपूर, माधव गोविंद कारभारी, सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक, बीड, बलीराम राजाराम कदम, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, ज्ञानदेव धींडीराम गवारे, सेवानिवृत्त अपर पोलीस अधीक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद, सुरेश इस्तारी भोयर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, नागपूर ग्रामीण, सोपान यशवंत पवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, बृहन्मुंबई, प्रदीप विठ्ठल सुर्वे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नवी मुंबई, गौतम परशराम गडमडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर, बळीराम विठोबा जीवतोडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, मनोहर दगडू धनावडे, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर, चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, विष्णू पांडुरंग मळगावकर,पोलीस उपनिरीक्षक (एक टप्पा पदोन्नतीने) वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई, पंडीत देवराम पवार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, शिवाजी तुकाराम धुरी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, पुणे, दामोदरप्रसाद फत्तेशंकर सिंह, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, नागपूर, कौशलधर त्रिवेणीधर दुबे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13,नागपूर, तुकाराम भाऊसो पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, पुणे, प्रवीण पोपटलाल गुंदेचा, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई,बाळासाहेब ईश्वर गवळी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, विश्वनाथ बुधाजी पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, रायगड, रमेश हरी खवळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, नंदूरबार, विनोद लालताप्रसाद तिवारी, पोलीस उपनिरीक्षक, चंद्रपूर, वसंत यशवंत गवळी, पोलीस उपनिरीक्षक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे, शिवाजी किसन घुगे, पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, रामचंद्र बापू सावंत, पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, तानाजी मारुती लावंड, पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, मिर्झा अन्वर बेग इब्राहिम बेग, पोलीस उपनिरीक्षक,नांदेड, सदाशिव गंगाधर नाठे, पोलीस उपनिरीक्षक, ठाणे शहर, दीपक परशुराम सावंत, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रत्नागिरी, दिलीपकुमार तुकाराम भंडारे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, भिकाजी सदाशिव राणे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, दगडू फकिरा अजिंठे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, नंदूरबार, माणिक दौलतराव तायडे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, नागपूर, सच्चिदानंद कन्हैय्या राय, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 13, नागपूर, केशव किसन मोरे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 4, नागपूर, शिवाजी काशिनाथ पाटील, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, नाशिक ग्रामीण, पोपट बाजीराव कड, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 2, पुणे, तेजराव ग्यानोबा हाके, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 3, जालना, साहेबराव देवमन सूर्यवंशी, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक,नाशिक ग्रामीण, सुरेश दिनकर इंगवले, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर, रमेश दौलत कोते, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, नंदूरबार, सुरेश रामू माने,सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र, दौण्ड, जीवनकुमार गजेंद्र कापुरे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, पुणे, भगवान देवाजी काकडे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, जालना, उल्हास रामचंद्र गावकर, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 1, पुणे, केशव तुकाराम हजारे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 5, दौण्ड, जनार्दन तुळशीराम राजूरकर, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, लातूर, बाळासो नानसो जगदाळे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, सातारा, हनमंत बापूराव आवळे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, सुरेश काशिनाथ राऊत, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 5, दौण्ड, अर्जुन दादा वाकसे, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, दादासाहेब बाबुराव घुले, सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, प्रशिक्षण केंद्र, दौण्ड, माधव रामजी गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक, औरंगाबाद शहर, विश्वास धनराज सोनावणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 6, धुळे, सय्यद रेहमान चाँदपाशा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लातूर, रामआसरे रामकृपाल मित्रा, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर ग्रामीण, ईश्वर देवराव किनकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर, बाळासाहेब शंकरराव टोके, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर, अप्पासाहेब सातगोंडा पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर,मधुकर निवृत्ती रणपिसे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, विकास माधव यावलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तानाजी बाबासाहेब जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, विजय राजाराम महाडिक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बृहन्मुंबई, अशोक तुकाराम पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, कोल्हापूर, पिराजी बापू मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 2, पुणे, त्रिंबक गोविंद घरत, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 2, पुणे, कै. अनिल नथू सालीयन, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, बृहन्मुंबई ( पत्नी श्रीमती सुजाता अनिल सालीयन यांना पदक प्रदान),निशिकांत सदाशिव साळवी, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, बिनतारी संदेश विभाग, मुंबई, कमलाकर रामचंद्र जाधव, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, बिनतारी संदेश विभाग, पुणे, रविंद्र बाळकृष्ण दळवी, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, बृहन्मुंबई, रामचंद्र कान्हू तापकीर, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, पुणे शहर, अशोक मल्हारराव झोळ, सेवानिवृत्त पोलीस हवालदार, पुणे शहर, राजेंद्र बापूराव जगताप, पोलीस हवालदार, पुणे शहर, शांताराम गेनभाऊ डुंबरे, पोलीस हवालदार, बृहन्मुंबई, संपत महादेव जाधव, पोलीस हवालदार, पुणे शहर.