Published On : Mon, May 28th, 2018

एसटीला करमुक्त डिझेल द्या; दिवाकर रावतेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Advertisement

Diwakar Raote
मुंबई: इंधनाच्या वाढत्या दराचा परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होतांना दिसत आहे. वाढलेल्या दरामुळे कर्मचाऱ्यांचा होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. महामंडळाला या अडचणीतून सोडविण्यासाठी राज्य सरकारने महामंडळाच्या बसेसना पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवर लावलेले कर माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

परिवहन मंत्री रावते यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “सध्या दिवसेंदिवस होत असलेल्या भरमसाठ इंधन दरवाढीचा विपरित परिणाम एसटी महामंडळाच्या आर्थिक व्यवहारावर होतांना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे महामंडळाला वार्षिक अंदाजे ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.” तसेच, “एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह होऊ घातलेला वेतन करारही अडचणीत आला आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या बसेसला लागणाऱ्या डिझेलवरील राज्य सरकारची करमाफी करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी”, अशी विनंतीही रावतेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.