
नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ या शब्दाचा उल्लेख केला. यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. झाशी राणी चौकात भाजप नेत्यांनी याच्या निषेधार्थ आंदोलन केले.
याला आता प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरे गट आज रस्त्यावर उतरणार आहे. शहर व जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज दुपारी ३ वाजता भाजप विरोधात व्हरायटी चौकात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
फडणवीस यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य योग्यच आहे. भाजपाकडून होत असलेल्या राजकारणाने राज्याला कलंक लागला आहे. त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलने, प्रेतयात्रा असे प्रकार करण्यात आले तर आम्हीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार आहोत, असे माजी खासदार प्रकाश जाधव म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री व पालकमंत्री असताना केलेल्या कामात कसा व किती भ्रष्टाचार झाला हे लवकरच पुढे, असा इशाराही जाधव यांनी दिला. भाजपाकडून होणाऱ्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र, आंदोलन व विरोध करण्याची एक पद्धत असते. प्रेतयात्रा काढणे व पोलिसांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नाही, असेही ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...




