Published On : Sat, Oct 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

शिवाजी पार्कवरील आंदोलन भोवले; CJPच्या अभिजीत दीपकेसह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

Advertisement

शिवाजी पार्कवरील आंदोलन भोवले; CJPच्या अभिजीत दीपकेसह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

मुंबई : शिवाजी पार्क येथे पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन केल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) चार पदाधिकाऱ्यांविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि रत्ना सिंह यांचा समावेश आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून शुक्रवारी शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मोठ्या संख्येने नागरिकांना एकत्र करून आंदोलन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

शिवाजी पार्कच्या वापरासाठी मुंबई महापालिकेची आवश्यक परवानगी नसणे, ध्वनिप्रदूषणाची शक्यता, वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम तसेच परिसरातील रुग्णालयांकडे जाणाऱ्या मार्गांवर अडथळा निर्माण होण्याची शक्यता या कारणांमुळे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले होते.

परवानगी नसतानाही आंदोलन केल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांसह राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विशेष मतदार यादी पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया रद्द करावी आणि २०२५च्या मतदार यादीच्या आधारे २०२९ची निवडणूक घेण्यात यावी, अशा मागण्या CJPने केल्या आहेत. मुंबईनंतर देशातील अन्य शहरांमध्येही आंदोलन करण्याची घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.