Published On : Fri, Jul 5th, 2019

धंतोली झोन अंतर्गत जाहीर लिलावाव्दारे मालमत्ता विक्री करुन थकीत मालमत्ता कर वसुल

धंतोली झोन क्रं.4 कर व कर आकारणी विभाग अंतर्गत दि.५/०३/२०१९ ला बकाया कर वसुली करीता एकुण ९ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता. त्यामध्ये वार्ड क्रं.६ घर क्र. 338/6/GF/49A घर मालक मे. अरित्रा इन्व्हेंस्टमेंट अन्ड ट्रेडींग लि.

आणी शौरी इन्व्हेस्टमेंट अन्ड ट्रेडींग प्रा.लि कब्जेदार श्रीमती व्ही.एम.नागरकर, गणेशपेठ, एस.टी.बस स्टॅन्ड चौक, नागपूर ही मालमत्ता थकीत कर वसुली करीता रु 12,86,700/- या महत्तम बोलीवर श्री. सौरभ राजीव चव्हान व सौ.दिपाली सौरभ चव्हान यांना विकण्यात आली.

दि. ४/०७/२०१९ ला म.न.पा.उपायुक्त श्री. राजेश मोहीते यांचे हस्ते सदर्हु मालमत्तेची सेल सर्टीफीकेट करुन देण्यात आले, यावेळी सहा.आयुक्त कु.‍ स्मिता काळे, सहा. अधिक्षक श्री.विजय थुल, कर निरीक्षक श्री.सुभाष बैरीसाल व श्री. मनोहर राठोड उपस्थित होते.