Published On : Wed, Feb 12th, 2020

नागरीकत्व कायद्या विरोधात कामठी शहर कांग्रेस सेवादल कडून निषेध कार्यक्रम

कामठी :-सुधारित नागरिकत्व कायदा(सिएए)व प्रस्तावित राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी(एन आर सी) कायद्याविरोधात हे बील केंद्र सरकार ने परत घ्या तसेच ईव्हीएम मशीन वर बंदी आणण्यासाठी कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने अध्यक्ष मो सुलतान मो युसूफ यांच्या नेतृत्वात आज रुईगंज मैदानात आयोजित निषेध कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होत हजारोच्या वर संख्येतील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता तसेच सहभागी झालेल्या महिला समुदायाच्या गर्दीत कामठीत शाहीनबाग चे दर्शन घडले. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या निषेध कार्यक्रमाचे दुपारी 4 वाजता कामठी तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार सुनील तरुडकर यांना सामूहिक निवेदन सादर करून निषेध कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

याप्रसंगी देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत असून देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे .केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाच्या तिजोरीत पुरेसा निधी जमा झालेला नाही .केंद्र सरकारने देशाच्या रिजर्व फंड वापरायला सुरुवात केली आहे .सिएए, एनआरसी सारखे कायदे आणून देशातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे आणि या गोंधळा त सरकारने देशाचे नवरत्न असलेल्या कंपन्या विकायला काढले आहेत .सरकारी मालकीच्या आस्थापना कवडीमोल भावाने खाजगी मालकांना विकण्यात येत आहे .भारतातील नागरिकांना त्यांचे भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा नोटबंदी सारख्या रांगेत उभे राहावे लागणार आहे .हा कायदा मागे न घेतल्यास कायदा अंमलात आला तर देशात अराजकता माजेल .हा कायदा केवळ मुस्लिम विरोधी नसून 80 टक्के भारतीय अडचणीत येणार असल्याचे समयोचित मार्गदर्शन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर नेत्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात कांग्रेस सेवादल, कांग्रेस , राष्ट्रवादी कांग्रेस, भीम आर्मी, जमेतूल हिंद हे हिंद , इंटक आदी संघटनांनी सहभाग दर्शविला होता

याप्रसंगी व्यासपीठावर कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेश भोयर, अमोल देशमुख, कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती चे हुकूमचंद आंमधरे, नागपूर जिल्हा कांग्रेस सेवादल अध्यक्ष तुळशीराम काळमेघ, नागपूर जिल्हा ग्रा कांग्रेस अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, कांग्रेस शब्बीर विद्रोही, मुजीब पठाण, नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत, कांग्रेस नागपूर जिल्हा ग्रा महासचिव आबीद भाई ताजी, जिल्हा परिषद सदसया प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, पंचयात समिती उपसभापती आशिष मललेवार, राजकुमार गेडाम, भन्ते नागदीपणकर, भन्ते बुद्धरत्न संबोधी, डॉ नौशाद सिद्दीकी, प्रशांत बन्सोड, किशोर धांडे, अर्षद विद्रोही, गुड्डू मानवटकर, अविनाश ऊकेश आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी