Published On : Thu, Aug 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहीम वेगात; सुमारे ६ लाख नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू

Advertisement

नागपूर-भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत नागपूर जिल्यात मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रक्रियेत जिल्यातील सुमारे ५ लाख ९५ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. घराघरांत जाऊन सुरू असलेली प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक प्रशासनाच्या तपासणीत मतदार यादीतील अनेक त्रुटी आणि विसंगती समोर आल्या आहेत. मृत झालेल्या व्यक्तींची नावे अद्याप यादीत कायम असणे, एकाच मतदाराची विविध पत्त्यांवर किंवा मतदारसंघांत नोंद असणे तसेच कायमस्वरूपी अन्य शहर किंवा राज्यात स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे जुन्या मतदार यादीत राहणे, ही प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर जिल्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये ४६ लाखांहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत. त्यापैकी ३२ लाखांपेक्षा अधिक मतदारांची माहिती आतापर्यंत तपासण्यात आली आहे. बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरांत जाऊन अर्ज वाटप, माहिती संकलन आणि डिजिटल प्रणालीवर नोंदी अद्ययावत करण्याचे काम करत आहेत.

मात्र, काही भागांत बीएलओ नागरिकांच्या घरी पोहोचले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक मतदारांना अर्ज सादर करता आले नसून, त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना योग्य माहिती देण्याचे आवाहन केले असून, जाणूनबुजून चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही दिला आहे.

Advertisement

दरम्यान, या मोहिमेवरून राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधी पक्षांनी सर्वेक्षणातील त्रुटींमुळे पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू शकतात, अशी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावा आणि हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल, त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराचे नाव चुकीने वगळले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

₹7.68 करोड़ की कथित ठगी का खुलासा #NagpurNews #Crime #CyberFraud #LoanFraud #BankFraud #newsupdate

₹7.68 करोड़ की कथित ठगी का खुलासा #NagpurNews #Crime #CyberFraud #LoanFraud #BankFraud...

एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की एक और कार्रवाई #NagpurNews #Crime #Police #MDDrugs #antinarcoticsforce

एमडी ड्रग्स के खिलाफ पुलिस की एक और कार्रवाई #NagpurNews #Crime #Police...

कामठी में ट्रेन की चपेट में आने से 14 वर्षीय किशोर की मौत #NagpurNews #Kamthi #TrainAccident #news

कामठी में ट्रेन की चपेट में आने से 14 वर्षीय किशोर की...

70 ग्राम MD Drugs के साथ आरोपी गिरफ्तार #NagpurNews #Crime  #MDDrugs #Mephedrone #DrugFreeIndia

70 ग्राम MD Drugs के साथ आरोपी गिरफ्तार #NagpurNews #Crime #MDDrugs #Mephedrone...

"रिश्तों को किया शर्मसार! रिश्तेदार ने युवती को भेजे अश्लील मैसेज #NagpurNews #WomenSafety #justice

"रिश्तों को किया शर्मसार! रिश्तेदार ने युवती को भेजे अश्लील मैसेज #NagpurNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges