Published On : Fri, Jun 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अहमदाबाद दौरा; अपघातस्थळी भेट देत परिस्थितीचा घेतला आढावा

Advertisement

अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांच्या सोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी हेही उपस्थित होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कालच घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक माहिती घेतली होती.

विमानतळावर तातडीची बैठक, तपास प्रक्रियेस गती-

अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपत्कालीन बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली गेली आणि पुढील तपास व मदतकार्याच्या दिशेने चर्चा करण्यात आली. अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीने मदत पुरवण्यावर भर देण्यात आला.

ब्लॅक बॉक्स व कॉकपिट रेकॉर्डर सापडले, कारण शोधण्यास मदत होणार-

Advertisement

अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बचाव पथकांना विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर मिळाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेमागचं नेमकं कारण शोधण्यास आता मदत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमानाचे तांत्रिक बिघाड की मानवी चूक – याबाबतचा निर्णय तपासानंतर होईल.

दुर्दैवी मृत्यूंची संख्या २९७ वर, फक्त एकजण बचावला-

या भीषण अपघातात आतापर्यंत २९७ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. बोईंग ७८७ ड्रीमलाइनर या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यातील २४१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर केवळ एकजण सुदैवाने वाचला. मृतांमध्ये २२९ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. याशिवाय, ज्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले, तेथील ५६ जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शोकाकुल वातावरण, देशभरातून शोकसंवेदना-

या अपघातानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत असून अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाइकांना मदतीची घोषणा केली असून, राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी मदतकार्य राबवले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.