Published On : Sat, Apr 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपुरात केली भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील प्रचारसभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपूरमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. त्यांनी राजभवनात मुक्काम केला. आज शनिवारी सकाळी ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे.

मोदी यांचे शुक्रवारी दुपारी पाच वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने वर्धा जिल्ह्यात प्रचारसभेला गेले. ती आटोपून ते रात्री नागपूरला मुक्कामासाठी आले होते.

शनिवारी सकाळी ९ वाजता ते नांदेड व परभणी येथे आयोजित प्रचारसभेसाठी रवाना होतील.

तत्पूर्वी ते भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. यापूर्वीही मोदीं यवतमाळच्या सभेसाठी नागपूरला आले असता विमानतळावर कार्यकर्त्यांची भेट घेतली होती.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.