Published On : Thu, Apr 12th, 2018

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीतील डॉ. आंबेडकर स्मारकाचे उद्घाटन

Advertisement

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी १३ एप्रिल रोजी दिल्लीतील २६, अलीपूर रोड स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन होणार आहे.

भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे दिल्ली स्थित २६, अलीपूर रोड येथील महापरिनिर्वाण स्थळाच्या ठिकाणी त्यांच्या जीवनकार्याचा व योगदानाचा परिचय करून देणारे स्मारक उभारण्यात आले आहे. २१ मार्च २०१६ रोजी या स्मारकाच्या बांधकामाची कोनशिला प्रधानमंत्री मोदी यांनी ठेवली होती.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १ नोव्हेंबर १९५१ ला केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. त्यानंतर ते दिल्लीतील २६, अलीपूर रोड येथील सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहू लागले. पुढे ६ डिसेंबर १९५६ रोजी याच ठिकाणी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी २ डिसेंबर २००३ ही वास्तू देशाला समर्पित केली.

डॉ. आंबेडकर स्मारकाची वैशिष्टे
भारतीय संविधान निर्माते ही ओळख जनतेपर्यंत पोचविण्यासाठी स्मारकास पुस्तकाचा आकार देण्यात आला आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकरांची १२ फुटांची कास्य प्रतिमा, प्रदर्शन स्थळ, तथागत गौतम बुद्धांची ध्यानस्थ प्रतिमा येथे आहे. या स्मारकाच्या ठिकाणी ध्यान केंद्र, बोधी वृक्ष आणि कारंजेही आहेत.

Advertisement

एकूण ७३७४ चौ.मीटर उंचीचे हे स्मारक एकूण ६७५८ चौ. मीटर क्षेत्रावर उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या प्रवेश द्वारावर ११ मीटर उंचीचे अशोक स्तंभ आणि याच्या मागे ध्यान केंद्र आहे. यासोबत पावसाच्या पाण्याचा उपयोग करून तयार करण्यात आलेली जलसिंचन व्यवस्था, सौरउर्जेचे सयंत्र बसविण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.