Published On : Thu, Dec 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल !

Advertisement

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर दाखल होतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईत पार पडणार आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील शपथ घेणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.