Published On : Thu, Mar 26th, 2020

नगरपरिषषद कन्हान-पिपरी श्रेत्रीत प्रतिबंधात्मक फवारणी सुरू.

Advertisement

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी व्दारे वेकोली काम़ठी सब एरियाची अग्निशमन बंब गाडीने शहरातील मुख्य महामार्ग व रस्त्यावर कोरोना विषाणुचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन सोडियम हाईपोक्लोराईड फवारणी करण्यात येत आहे.

संपुर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुभाव झपाटाने वाढत अस ल्याने राज्याच्या आरोग्य मंत्र्याच्या आदे शानुसार कन्हान नगरपरिषदेचे मुख्याधि कारी संदीप चिधंनवार हयानी वेकोली खुली कोळसा खदान कामठी सब एरिया मँनेजर यास विनंती करून १० दिवसा करिता त्यांची अग्निशमन बंब गाडी मागु न (दि.२५) ला रेल्वे स्टेशन रोड, पोलीस स्टेशन ते आंबेडकर चौक महामार्ग, विवेकांनद नगर, पिपरी रोड, धरमनगर, पटेल नगर परिसरातील रस्त्यानी व गुरूवार (दि.२६) ला दुपारी तारसा रोड चौक ते नांका न ७ महामार्गाने, तारसा रोड चौक ते गहुहिवरा रोड, आदीवासी गोवारी चौकापर्यंत अग्निशमन बंब गाडी व्दारे सोडियम हाईपोक्लोराईड फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, विरोधी पक्ष गटनेता राजेंद्र शेंदरे, स्विकृत नगरसेवक नरेश बर्वे,नगरसेवक मनिष भिवगडे, विनय यादव, नगरसेविका मोनिका पौनिकर, गुफाता़ई तिडके, स्वच्छता विभागाचे सचिन टालेवार, प्रितम सोमकुवर, उमेश कठाणे, अमित साबांरे, पंकज वांढरे, लकेश माहातो सह कर्मचा-यांच्या सहकार्याने फवाऱणी करण्यात आली. कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन आणखी एक आठवडा शहरात ही फवारणी करण्यात येणार असल्याने फवारणी च्या वेळी दुकानदारांनी दुकान बंद करून व नागरिकांनी घराचे दरवाजे लावुन घरात राहुन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर व नगरसेवकांनी केले आहे.