Published On : Fri, Aug 16th, 2019

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर जिल्हा दौरा

Advertisement

नागपूर: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उद्या, शनिवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी नागपूर – वर्धा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा नागपूर व वर्धा जिल्हा दौरा खालील प्रमाणे-

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतीय हवाई दलाच्या विमानाने सकाळी 10.05 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर सकाळी 10.15 वाजता भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने वर्धाकडे प्रयाण करतील. वर्धा येथील स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे दुपारी 12.55 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर राजभवनकडे प्रयाण करतील. दुपारी 1.25 वाजता राजभवन येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता शासकीय वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.50 वाजता नागपूर विमानतळावर आगमन व राखीव. दुपारी 4.00 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे भारतीय हवाई दलाच्या विमानाने मुंबईकडे प्रयाण होईल.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.