Published On : Thu, Jul 1st, 2021

डॉक्टर्स डे निमित्य बालरोगतज्ञ यांना धन्वंतरी सन्मान पुरस्कार प्रदान

– भाजप वैद्यकीय आघाडीचे आयोजन

नागपुर – भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर शहर द्वारा 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे निमित्याने नागपुरातील सामाजिक व आरोग्य क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान दिलं अशा डॉक्टरांचा धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.

यामध्ये कोविड काळात लोकसेवार्थ कार्य केल्याबद्दल सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ उदय जी बोधनकर, जनरल फिजिशियन व विख्यात मधुमेह रोग तज्ञ डॉ जय देशमुख सर , विख्यात नेत्ररोगतज्ञ खासदार पद्मश्री मा.डॉ विकासजी महात्मे,एनसिआय चे डॉ मैथिली पांडे,आणि डॉ. पवन अरगडे यांचा भाजप वैद्यकीय आघाडी नागपूर शहर द्वारा या मान्यवर डॉक्टर्सचा धन्वंतरी मूर्ती, सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आलं.भाजप वैद्यकीय आघाडीचे शहर अध्यक्ष डॉ गिरीश चरडे यांचे हस्ते तसेच महामंत्री डॉ श्रीरंग वराडपांडे,डॉ ढाकुलकर, डॉ पाटील, डॉ ललित जैन, डॉ प्रणय चांदेकर, संदीप पांडे, आणि समस्त पदाधिकारी वैद्यकीय आघाडी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.